आपला जिल्हा

“अंबक येथील तरुणीस विषारी घोणस आळीचा दंश” शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण…..

चिंचणी येथील रुग्णालयात उपचार

“अंबक येथील तरुणीस विषारी  घोणस आळीचा दंश”शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण…..

चिंचणी येथील रुग्णालयात उपचार…. 

‘महाराष्ट्र कट्टा’ न्यूज…

कोरोनाच्या विळख्यातून कसंबसं सावरत असताना घोणस अळी नावाच्या अति विषारी अळीचे संकट आता समोर आले आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी बीड येथील एका शेतकऱ्याला या अळीने दंश केल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना तशीच अळी सांगली जिल्ह्यात सापडली आहे. अंबक तालुका कडेगाव येथील शेतातील घरात राहत असलेल्या कुटुंबातील अश्विनी नंदकुमार जगदाळे वय २० या  तरुणीच्या  पायाखाली घोणस आळी सापडल्याने  व आळीचा दंश तळपायाला झाल्याने तिला  चिंचणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बीड जिल्ह्यातील  एका शेतकऱ्याला घोणस आळीने दंश केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आता हे संकट सांगली जिल्ह्यात आल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. अंबक येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे ही युवती रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. यावेळी घराजवळ असलेल्या गवतात असलेल्या घोणस नावाची विषारी अळीवर तिचा पाय पडला. यावेळी आश्विनीच्या तळपायाला  आळीने  दंश केला  व अळीच्या अंगावरील काटे तळपायाला टोचले. यानंतर वेदना असह्य  झाल्यानं तीला चिंचणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.यानंतर पुढील उपचारासाठी चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. आश्विनीच्या आईने ही  आळी प्लास्टिकच्या पिशवीतुन डॉक्टरना दाखवण्यासाठी रुग्णालयात आणली होती यामुळे ती घोणस आळी असल्याचे स्पष्ट झाले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!