Ranya Rao Arrest: MAharashtra Katta
सिनेमा

Ranya Rao Arrest: दुबई ट्रिप्स, Gold Smuggling आणि सुरक्षा बायपास सेटिंगचा पर्दाफाश!

Spread the love

Ranya Rao Arrest : 14 किलो सोन्याची तस्करी, दुबई फेऱ्या आणि पोलिस सुरक्षेतील गडबड उघड!

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणात प्रसिद्ध कन्नड आणि तामिळ अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला बेंगळुरू विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) अटक केली आहे. दुबईहून परतत असताना तिच्याकडे 14.2 किलो सोने सापडले, ज्याची बाजारातील किंमत 12.56 कोटी रुपये इतकी आहे.

15 दिवसांत 4 वेळा दुबई ट्रिप!

रान्या रावने 15 दिवसांत 4 वेळा दुबईला भेट दिली, यामुळे तिच्यावर आधीपासूनच गुप्तचर यंत्रणांचे लक्ष होते. विशेष म्हणजे, तिचे दुबईमध्ये कोणतेही व्यावसायिक संबंध नसताना तिने वारंवार तेथे प्रवास केला, त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिच्यावर पाळत ठेवली.

Airport Security Bypass आणि पोलिस मदत!

DRI च्या माहितीनुसार, बसवराजू नावाच्या एका पोलीस हवालदाराने विमानतळावरील तपासणी टाळण्यासाठी रान्या रावला मदत केली. त्याने सुरक्षेत बायपास सेटिंग करून तिला सहजपणे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. मात्र, DRI अधिकाऱ्यांनी आधीच तिच्यावर लक्ष ठेवले होते आणि तिला रंगेहाथ पकडले.

सोन्याची तस्करी आणि ब्लॅकमेलचा आरोप!

चौकशीदरम्यान, रान्या रावने तस्करीसाठी ब्लॅकमेल केल्याचा दावा केला आहे. तिच्या अटकेनंतर, कॉन्स्टेबल बसवराजू यालाही ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Ravikant Tupkar यांची Krantikari Shetkari Sanghtana लवकरच Maharashtra मध्ये तुफान आणणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *