संपादकीय

मदतीचा हात ‘विश्वजीत’ : पलूस-कडेगावचं ‘कदम सरकार….

मदतीचा हात ‘विश्वजीत’ : पलूस-कडेगावचं ‘कदम सरकार….

‘महाराष्ट्र कट्टा’ न्यूज…..

आ.डॉ.विश्वजीत कदम हे नुसतं नाव नाही, तर हा एक आधार आहे. आधार आहे, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा, विद्यार्थ्यांचा आणि सर्वांचा म्हणजे सर्वांचा, अगदी समाजातील शेवटच्या व्यक्तीचा..आपल्याकडे कोणीही येवो, त्याला मोकळ्या हाताने परत पाठवायचा नाही, आपल्या परीने त्याला जी मदत करता येईल ती करायची, या डॉ.पतंगराव कदम(साहेब) व आदरणीय विजयमाला कदम(वहिनीसाहेब) यांच्या संस्कारांच्या मुशीतून वाढलेले व घडलेले हे नेतृत्व, आज स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या मातीची आणि आपल्या माणसांची सेवा करत आहे. याची प्रचिती त्यांच्या कार्याने अनेकदा आली आहे. आमदार, राज्याचा मंत्री म्हणून तर त्यांनी आपल्या भागाला भरभरून दिलंच, देतही आहेत.

पण त्यापलीकडे जाऊन ही लोकांना ते मदतीचा हात देत आहेत, त्यांचा आधार बनत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रम्हाकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या कडेगाव येथील केंद्रास त्यांनी पाच लाखांची मदत केली.

स्व.पतंगराव कदम साहेबांच्या स्मृतिदिनी पलूस-कडेगाव साठी  अत्याधुनिक पद्धतीच्या कॅरिडॉर रुग्णवाहिका, घोगाव येथील बिरोबा मंदिरास २ लाख ५० हजार, वडियेरायबाग येथील बिरोबा मंदिरास २ लाख याशिवाय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक चळवळी व संघटनांना सुद्धा वेळोवेळी मदत करून त्यांना बळ देण्याचे काम त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व विशेष कौशल्यवान लोकांना पुढच्या कार्यासाठी आर्थिक हातभार लावण्यासोबतच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या अनेकांना त्यांनी मदतीचा हात देत, त्यांचा प्रयत्नांना वेळोवेळी बळ दिले आहे.

त्याचबरोबर मतदारसंघात अनेक गावात मंदिरे, समाजमंदिरे यास सढळ हाताने मदत केल्याची शेकडो उदाहरणे देता येतील. देवराष्ट्रे येथे मिनी जिप्सी तयार करणाऱ्या दत्तात्रय लोहार असो किंवा फेसाटीकार नवनाथ मोरे सर्वांना मदतीचा आधार देणारा हा ‘आधारवड’.

राज्यातीलच नव्हे तर देशातील अग्रगण्य असणाऱ्या ‘भारती विद्यापीठ’ आजही हजारो विद्यार्थ्यांना फी सवलत दिली जाते, त्यावेळी तो कोणता, कुठला व कुणाचा हे कधीही पाहिले जात नाही, हेतू फक्त एकच पैसा साठी कुणाचे शिक्षण थांबता कामा नये, साहेबांनी घालून दिलेला हा सिद्धांत मोठ्या ताकतीने विश्वजीत कदम पुढे घेऊन जात आहेत, भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्ण सेवा अविरतपणे सुरू आहे, वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचे काम नित्यपणे सुरूच आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी जे केलं, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले, या भागाचा आमदार किंवा राज्याचा मंत्री यापेक्षाही पलूस-कडेगावचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या कामाला तोड नाही. मतदारसंघात प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर व प्रत्येक घरात घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या त्यांनी पोहचल्या.

पुणे, सांगली, कडेगाव व पलूस याठिकाणी भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना उपचार दिले, जिल्ह्यातील कोरोना योध्याना सॅनिटायझर व इतर आरोग्य वस्तुंचे किट पुरविण्यात आली. ज्यांना दोन वेळचं जेवण मिळाले नाही, त्यांना निरंतर पणे जेवणाची सोय केली.

इतर राज्यातील मजुरांना स्वतःच्या खर्चाने त्यांच्या घरी पोहचवले या भयानक परिस्थितीत ही काही कमी पडू दिले नाही, महापूरात त्यांनी केलेल्या कामाची दखल अख्या महाराष्ट्राने घेतली, राज्यातील विरोधी पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी सुद्धा त्यावेळी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या मतदारसंघातील, जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाच, त्यांचे संसार उभे केलेच अगदी धान्यापासून ते घरातील साहित्यपर्यंत व स्वछेतेपासून आरोग्यापर्यंत आणि अगदी जनावरापर्यंत सर्वांना आधार दिला, आणि तो ही स्वतः पुराच्या पाण्यात उतरून, त्याचबरोबर राज्यातील पूरग्रस्तांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री निधीस २५ लाखांची मदत त्यांनी केली. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय घडामोडी घडल्या व महाविकास आघाडीचे सरकार गेले, पण त्यावेळी देखील आपल्या मतदारसंघातील प्रमुख  कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी सर्वांना आश्वस्त केले, राज्यातील सत्ता समीकरणे काहीही आणि कशीही असोत त्याचा कसलाही परिणाम कडेगाव पलूस च्या विकासावर होणार नाही, आणि त्यापद्धतीने विकासाचा वेग आजही कायम आहे. अशीच काहीशी परिस्थिती २०१४ साली झाली होती, १९९९ व त्याआधी पासून डॉ.पतंगराव कदम साहेब सातत्याने राज्याचा मंत्रिमंडळात मातब्बर मंत्री म्हणून कार्यरत होते, त्यानंतर सत्तांतर झाले पण त्याचा परिणाम पलूस-कडेगाव वर कधीच झाला नाही, खरं तर कदम पिता-पुत्रांचे हेच वेगळेपण आहे, आपल्या मतदारसंघात व आपल्या लोकांसाठी काम करत असताना त्यांना कधीही सत्ता व सत्ताकारण याची गरज भासत नसते, आणि ही बाब इथल्या जनतेला सुद्धा माहिती असून राज्यात आणि देशात कोणाचेही सरकार असले तरी पलूस-कडेगाव मध्ये मात्र ‘कदम सरकारचं’ असं या मतदारसंघाच गणित आहे. आणि इथल्या प्रत्येकाचा तो विश्वास देखील आहे. म्हणूनच मदतीचा हात म्हणजे ‘विश्वजीत’ असा दृढ विश्वास निर्माण झाला आहे, आणि राज्यात व देशात कोणतंही सरकार असलं तरी याठिकाणच सरकार ‘कदम सरकारचं’ अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!