राज्यातील राजकीय परिस्थितीचा परिणाम पलूस-कडेगावच्या विकासावर होणार नाही, मतदारसंघाच्या विकासाठी मी सक्षम : आ.डॉ. विश्वजीत कदम…..
कडेगांव : प्रतिनिधी
राज्यातील राजकीय परिस्थितीचा व घडामोडींचा कसलाही परिणाम पलूस-कडेगावच्या विकासावर होणार नाही, मतदारसंघाच्या विकासाठी मी सक्षम आहे. आपल्या सर्वांचे प्रेम व डॉ.पतंगराव कदम साहेबांचा आशिर्वाद ही माझी सर्वात मोठी शक्ती आहे, आणि या शक्तीमुळे मला राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिपदाच्या काळात मी राज्यातील सर्व पक्षांच्या आमदारांना मदत केली आहे. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत राजकीय परिस्थितीची चिंता तुम्ही करु नका मतदारसंघाच्या विकास कामांची धमक माझ्याकडे आहे सर्व घटकांना न्याय देत पलुस कडेगांव मतदारसंघ राज्यात आदर्शवत विकास करणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी केले. कडेगाव तालुक्यातील तडसर येथे ३ कोटी ३७ लाख विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, कडेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सरपंच हणमंतराव पवार, प्रविण पवार, काँग्रेस सेवा दलाचे समिर मुल्ला प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले की, तडसर गावाच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. मंत्रीपदाच्या कार्यकाळात कडेगांव तालुक्यात २६५ कोटींची विकासकामे केली आहेत. सत्ता असो अथवा नसो मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू देणार नाही. यावेळी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाण्याची टाकी व गावातील पाणी वितरण, तडसर येथील आंबेडकर नगर येथे पेव्हिंग ब्लॉक, अंगणवाडी इमारत उदघाटन, मुस्लिम समाजासाठी शादीखाना इमारत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय इमारत, आरोग्य सेवा केंद्र, ट्रॅक्टर खरेदी, नाविन्यपूर्ण उद्यान, पवार मळा रस्ता कॉंक्रिटीकरण, संत तुकडोजी महाराज नगर रस्ता खडी व डांबरीकरण, आंबेडकर नगर समाज मंदिर सुशोभीकरण, तडसर स्मशानभूमी शेड बांधणे, सार्वजनिक सांडपाणी व्यवस्था, दलित वस्तीमध्ये सौर हायमास्ट दिवे, ग्रामपंचायत जागेत पेविंग ब्लॉक आदींचे उदघाटन डॉ.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच हणमंतराव पवार म्हणाले की, तडसर गावच्या विकासाबाबत आ.डॉ.विश्वजीत कदम साहेबांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्यामुळे तडसर गावाच्या विकासात व वैभवात भर पडली आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रतापराव पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार, पवन पवार, स्वाती झेंडे, विश्रांती पवार, सुरेखा पवार, रणजीत पवार, समीर मुल्ला, दीपक पवार, महेश पवार, मनोज पवार उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन व आभार धनंजय नरुले मानले.