Dhananjay Munde Resignation Case: Maharashtra Katta
Updates

Dhananjay Munde राजीनामा प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अखेर राजीनामा!

Spread the love

Dhananjay Munde यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट इशाऱ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांचा थेट इशारा?

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडसोबत जवळिकीच्या संबंधांमुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.
  • फडणवीस यांनी यापूर्वी ३-४ वेळा अजित पवार यांच्यासोबतही चर्चा केली आणि मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितले.
  • मात्र, मुंडे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, त्यामुळे फडणवीस यांनी थेट “राजीनामा द्या, नाहीतर राज्यपालांना पत्र लिहून मंत्रीमंडळातून काढावं लागेल” असा इशारा दिला.

राजीनामा टाळण्यासाठी प्रयत्न झाले, पण…

काल रात्रीच्या तणावपूर्ण घडामोडीनंतर आज सकाळी धनंजय मुंडेंनी अखेर राजीनामा दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंडे यांना यापूर्वी अनेकदा वॉर्निंग देण्यात आली होती, मात्र त्यांनी ती गांभीर्याने घेतली नाही.

पुढील राजकीय परिणाम काय असतील?

मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण तयार होऊ शकते. पुढे कोणत्या मोठ्या घडामोडी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *