महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यावर अखेर पडदा पडला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ८० दिवस उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई झाली नव्हती. या प्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले.
यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. अखेर ४ मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.
अजित पवार यांची थेट प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फक्त दोनच वाक्यं बोलली –
👉 “धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे.”
राजकीय भविष्यासाठी नवा टप्पा?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. हा राजीनामा नैतिक जबाबदारी स्विकारल्याचा संकेत आहे की राजकीय दडपशाहीचा परिणाम? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढे मुंडे यांची राजकीय वाटचाल कशी राहील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.