March 2025 Graha Yoga Maharashtra Katta
Astro

March 2025 ग्रहयोग 30 वर्षांनंतर शनि-सूर्य युती काही राशींसाठी आव्हानात्मक तर काहींसाठी शुभ

Spread the love

Astroloy नुसार ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यावर त्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. March 2025 मध्ये एक ऐतिहासिक घटना घडणार आहे कारण तब्बल तीस वर्षांनंतर काही प्रमुख ग्रह राशी बदल करणार आहेत. या महिन्यात सूर्य आणि शनि राशी बदल करणार असून बुध आणि शुक्र ग्रहांच्या स्थितीतही मोठे बदल होणार आहेत. यामुळे काही राशींसाठी हा महिना शुभ तर काहींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

मार्च महिन्यात होणारे ग्रह बदल

पहिल्या मार्चला शुक्र ग्रह राशी बदलणार आहे
पंधरा मार्चला बुध ग्रहाचा राशी बदल होणार आहे
चौदा मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे
एकोणतीस मार्चला शनि मीन राशीत गोचर करणार असून ते तब्बल अडीच वर्षे याच राशीत राहणार आहेत

शनि आणि सूर्य यांची मीन राशीत युती होणार असल्याने संपूर्ण राशीचक्रावर याचा प्रभाव दिसून येईल. विशेषतः मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना महत्त्वाचा ठरेल कारण त्यांना साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करावा लागेल. त्यामुळे काही अडथळे आणि संघर्षांचा सामना करावा लागू शकतो.

ज्या राशींना आव्हानांचा सामना करावा लागेल

मेष राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होत असल्याने मानसिक तणाव आणि जबाबदाऱ्या वाढतील त्यामुळे अहंकारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे
सिंह राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याच्या युतीमुळे कौटुंबिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे व्यवसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत
तुळ राशीच्या जातकांना नोकरी आणि व्यवसायात अडथळे येऊ शकतात संयम आणि चिकाटी ठेवण्याची गरज आहे

या राशींना लाभ मिळण्याची शक्यता

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत शुभ ठरणार असून उद्योगधंद्यात यश मिळू शकते तसेच नेतृत्वगुणांना वाव मिळेल
कर्क राशीच्या लोकांना शनि अडीचकीतून मुक्ती मिळेल नवीन संधी उपलब्ध होतील आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे
कुंभ राशीच्या धन स्थानात शनि आणि सूर्याची युती होणार असल्याने अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील

महत्त्वाचे उपाय आणि सल्ला

शनिवारच्या दिवशी काळ्या तीळाचा दान करावा
नियमित सूर्य आराधना करावी आणि सूर्य मंत्राचा जप करावा
धैर्य आणि संयम ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्यावेत

वरील माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारे देण्यात आलेली असून ही फक्त मार्गदर्शनात्मक माहिती आहे कोणत्याही अंधश्रद्धेला पाठिंबा दिला जात नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *