Bollywood

Kiara Sidharth Baby News : किआरा-सिद्धार्थकडे गोड बातमी, सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

Spread the love

Kiara Sidharth Baby Announcement : बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि सर्वांचे लाडके कपल Kiara Advani आणि Sidharth Malhotra लवकरच आई-बाबा बनणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ही खास गोड बातमी शेअर केली आहे. या अनाउन्समेंटसोबत त्यांनी एक क्युट फोटोही पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Kiara Advani आणि Sidharth Malhotra यांनी Instagram वर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोघांनी हातांची ओंजळ केली असून, त्यामध्ये लहान बाळासाठी असलेले लोकरचे मोजे ठेवले आहेत. या फोटोसोबत त्यांनी एक क्युट कॅप्शनही दिलं आहे – “The greatest gift of our lives Coming soon…” त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

Kiara Advani आणि Sidharth Malhotra लवकरच Parents होणार

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या किआरा आणि सिद्धार्थने 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. आता त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांनी आपल्या चाहत्यांना ही खास गोड बातमी दिली आहे. चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे, कारण किआरा आणि सिद्धार्थ यांच्या घरी लवकरच चिमुकला पाहुणा येणार आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह, कमेंट्सचा वर्षाव

सिद्धार्थ आणि कियाराच्या या गोड बातमीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रचंड प्रेमाचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “बेबीजला आता बेबी होणार!” तर दुसऱ्याने लिहिले, “आप दोनो को दिल से बधाई। नजरबट्टू (इमोजीसह)”. आणखी एका युजरने म्हटलं, “तुम्ही बेस्ट पॅरेंट्स ठराल!” या पोस्टनंतर सिद्धार्थ आणि कियाराच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

Kiara Advani आणि Sidharth Malhotra यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याने संपूर्ण बॉलिवूड आणि त्यांचे चाहते खूप आनंदित आहेत. त्यांच्या या गोड बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्याकडून अधिक अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या या नव्या प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *