कलिंगड (Watermelon) हे असे फळ आहे जे केवळ चविष्ट नाही, तर आपल्या आरोग्यासाठी अमृतासारखे कार्य करते. उन्हाळ्यात शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळवण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर मानले जाते. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन, अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. अशा वेळी कलिंगडाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
कलिंगडाचे आरोग्यासाठी फायदे:
किडनीसाठी वरदान
–
कलिंगडमध्ये 92% पाणी असते, जे किडनीच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कलिंगडाचा रस पिल्यास मूत्रपिंडातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि किडनी हेल्दी राहते. तसेच, किडनी स्टोन किंवा इन्फेक्शनच्या समस्यांमध्येही याचा फायदा होतो.
डिहायड्रेशनपासून बचाव
–
उन्हाळ्यात अधिक घाम येतो, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. कलिंगड नैसर्गिकरित्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि उष्णतेपासून संरक्षण देते.
त्वचेसाठी फायदेशीर
–
कलिंगडामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेसाठी उपयुक्त असतात. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग असतील, तर कलिंगडाचा रस प्रभावित भागावर लावल्याने त्वचा तजेलदार आणि स्वच्छ होते.
हृदयासाठी आरोग्यदायी
–
कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
इम्युनिटी बूस्टर
–
व्हिटॅमिन C, B6 आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कलिंगड रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला संसर्गांपासून वाचवते.
अस्थमाच्या रुग्णांसाठी लाभदायक
–
कलिंगडमध्ये 40% व्हिटॅमिन सी असते, जे अस्थमाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामुळे श्वसनमार्ग मोकळा राहतो आणि श्वासोच्छवासास मदत होते.
कलिंगड खाण्याचा योग्य मार्ग:
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कलिंगडाचा रस प्यायल्यास सर्वाधिक फायदा होतो.
संध्याकाळी किंवा रात्री उशिरा कलिंगड खाणे टाळा, कारण यामुळे थंडी व अपचन होऊ शकते.
कलिंगडाच्या बियांमध्ये देखील अनेक पोषक तत्त्वे असतात, त्यामुळे त्या वाया जाऊ देऊ नका.
