Bollywood

Vicky Kaushal: पंजाबी असूनही महाराज आमच्यासाठी देवता आहेत

Spread the love

सध्या Vicky Kaushal आपल्या आगामी चित्रपट ‘छावा’ मुळे खूप चर्चेत आहेत. या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारत आहेत. एका मुलाखतीत Vicky Kaushal यांनी महाराष्ट्र शी असलेल्या आपल्या गोड नात्याबद्दल खुलासा केला.

Vicky Kaushal चा जन्म मालवणी कॉलनी, मालाड मध्ये झाला. त्याने आपल्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या, ज्यात त्याने अंधेरी मध्ये वन बेडरूम मध्ये राहून दहावी पर्यंत मराठी शिकल्याचं सांगितलं. विकी म्हणाला, “माझं मराठी थोडं कमी आहे, पण मला ती भाषा समजते. मला असं वाटतं की जो कोणी मुंबई किंवा महाराष्ट्र मध्ये जन्म घेतो, त्याला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल काहीतरी माहिती असते.”

त्याने पुढे सांगितले, “मी पंजाबी कुटुंबात वाढलो असलो तरी, महाराज आमच्यासाठी देखील देवतेच आहेत.” विकी कौशल ने छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानत लहानपणी घरात असलेल्या महाराजांच्या मूर्तीला रोज हार घालणे आणि क्रिकेट खेळताना त्यांना आदर देणे याबद्दल बोलले.

चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, Rashmika Mandanna या चित्रपटात महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे, आणि Akshay Khanna ने औरंगजेब म्हणून एक वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे ट्रेलर पाहून चाहते आधीच सिनेमाच्या रिलिजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, आणि Vicky Kaushal यांच्या शिवाजी महाराज यांच्या भूमिकेची अपेक्षा शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *