jiohotstar अँप आलं ते १० आणि १३ वर्षांच्या बहीण भावांनी केलेल्या सेवेमुळे. हो हे खरंय! साधारण वर्षभरापूर्वी जिओ आणि disney + हॉटस्टार merger ची अधिकृत घोषणा करण्यात होती, पण हि घोषणा झाल्याच्या वर्ष भरा नंतर आता या दोघांचं actual merger झालं असून कालच jiohotstar अँप लाँच झालं आहे. पण अधिकृत घोषणे नंतर यांचं नवीन अँप यायला एवढा वेळ का लागला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर यामागे एक खूप मोठी आणि तितकीच intresting स्टोरी आहे. म्हणूनच जीओला हे अँप आणायला वर्ष का लागलं? यामागची काय स्टोरी आहे? आणि १० आणि १३ वर्षांच्या मुलांनी मेहरबानी करून कसं भारतातील सगळ्यात श्रीमंत असणाऱ्या reliance इंडस्ट्री वर उपकार केले? तेच जाणून घेऊयात …
गोष्ट सुरु होते २०२३ पासून जेव्हा jio व हॉटस्टार यांच merger होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. याच वेळी दिल्ली च्या एका मुलाने शक्कल लढवून jiohotstar.कॉम नावाचं डोमेन विकत घेऊन ठेवलं होत. त्यानंतर जेव्हा अपेक्षेप्रामाणे jio व हॉटस्टार यांच merger झालं. merger नंतर स्वाभाविकपणे त्यांच्या नवीन entity च नाव jio हॉटस्टार होणार होत, ज्यासाठी त्यांना डोमेन ची गरज होती. पण हे डोमेन आधीच या मुलाने घेऊन ठेवल होत. नंतर या मुलाने reliance ला एक पत्र पाठवल. यात या मुलाने jiohotstar या डोमेन च्या बदल्यात १ करोड १ लाख ७२हजार पाचशे आठ्यांनव रुपयांची मागणी केली. या मुलाला cambridge university मधून mba करायचं होत, व यासाठी त्याला या पैश्यान ची गरज होती. म्हणून त्याने हे सगळं केलं जेणेकरून त्याला परदेशी जाऊन शिक्षण घेता येईल. एवढी मोठी कंपनी आपल्याला या डोमेन च्या बदल्यात १ करोड नक्कीच देईल अशी त्यांची आशा होती मात्र असं काहीही झालं नाही.
रिलायन्सने या मुलाची १ कोटीची ऑफर नाकारली आणि त्याच्यावर ट्रेडमार्क उल्लंघनासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली.”जिओ” आणि “हॉटस्टार” हे दोन्ही established ब्रँड नेम्स असल्याने ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप त्यांनी या मुलावर केला. आणि हा प्रकार cybersquatting असल्याचा युक्तिवाद केला. जिथे काही लोक लोकप्रिय ब्रँडस सोबत जोडलेली डोमेन names मोठा प्रॉफिट कमावून विकण्यासाठी खरेदी करतात. तर हे प्रकरण स्वतःवरच उलटताना पाहून या मुलाने हे डोमेन दुबईतील १३ वर्षीय जैनम जैन आणि १० वर्षीय जीविका जैन यांना विकले.
जैनम आणि जीविका त्यांच्या YouTube चॅनेल मुळे प्रसिद्ध आहेत. ते DIY आणि SCIENCE experiment शी रेलटेड व्हिडिओस बनवतात. त्यासोबतच त्यांचा एक NGO देखील आहे. जिथे ते तरुणांना आधार देण्यावर लक्ष केंद्रित करतात. या दोन्ही मुलांनी हे डोमेन विकत घेतल्यानंतर त्यांचा philanthropic प्रवास शेअर करण्यासाठी वापरले. सोबतच या डोमेनचा पूर्वीचा मालक असणाऱ्या त्या तरुण मुलाला मदत करण्यासाठी आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे डोमेन खरेदी केले आहे असे सांगितले.
काही काळ हे डोमेन वापरल्यानंतर जैनम आणि जीविका ने नोव्हेंबर २०२४ ला हे डोमेन RELIANCE JIO ला परत देण्याचे ठरवले. ” सध्या चालू असलेल्या अफवां प्रमाणे कोणतेही पैसे किंवा व्यवहार न करता आम्ही हे डोमेन त्यांना हस्तांतरित करणार आहोत. यात कोणाचाही दबाव नाही आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार नाही, आम्ही सेवा म्हणून हे करत आहोत ” असं तेव्हा या दोघांकडून सांगण्यात आलं होत. आणि आम्ही सेवा करतोय असं म्हणत त्यांनी हे डोमेन परत केल्याने एकप्रकारे जैनम आणि जीविका यांनी reliance वर उपकार केल्याचं तेव्हा बोललं गेलं.
तर यासगळ्या डोमेन च्या वादानंतर डिसेंबर २०२४ पर्यंत, रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या Viacom18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने अधिकृतपणे JioHotstar.com डोमेनचे नियंत्रण मिळवले आणि हा मालकी वाद संपवला. त्यामुळेच merger होऊनही त्यांचं jiohotstar अँप यायला एवढा उशीर झाल्याचं सांगितलं जातंय .